◼️ प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर रविंद्र चव्हाण यांची पंतप्रधान मोदींशी पहिली भेट
◼️ महाराष्ट्रातील संघटनात्मक कामाचा आढावा पंतप्रधानांना सादर
◼️ पंतप्रधान मोदींकडून पुढील कार्यासाठी रविंद्र चव्हाण यांना शुभेच्छा
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र भाजपची संघटनात्मक घडामोडी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन व पक्षवाढीची दिशा याबाबत सविस्तर माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली.
या भेटीत चव्हाण यांनी ‘कार्य विस्तार अभियान’ संदर्भातील विशेष पुस्तिका पंतप्रधानांना सादर केली. या पुस्तकात महाराष्ट्रात बूथ पातळीवर सुरू असलेले संघटनकार्य, सदस्य नोंदणी मोहिम, पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, संपर्क अभियान आणि महिला-युवा आघाड्यांच्या उपक्रमांचा सविस्तर आढावा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्री. चव्हाण यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:23 28-07-2025














