लांजा : जांगलदेव मंदिर परिसरातील संरक्षक भिंत बांधकामाचे भूमिपूजन

लांजा : लांजा नगरपंचायतीकडून महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या आगरवाडी येथील श्री जांगलदेव मंदिर परिसरातील संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.

यावेळी नगरपंचायत लांजाचे माजी नगराध्यक्ष मनोहर बाईत, वाडीप्रमुख काशिराम आगरे, अध्यक्ष प्रमोद आगरे, प्रसाद भाईशेट्ये आदी उपस्थित होते.

श्री जांगलदेव मंदिर परिसराच्या सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत अत्यंत आवश्यक होती. या कामामुळे मंदिर परिसर अधिक सुरक्षित होणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले मंदिर परिसर अधिक सुशोभीत होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 28/Jul/2025