राजापूर मतदारसंघात १७३ मतदान केंद्रांवर होणार वेब कास्टिंग

राजापूर : राजापूर विधानसभा मतदारसंघातील पूर्वतयारीचे काम पूर्ण झालेले असून, त्याबाबतची माहिती मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जैसमिन यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मतदारसंघात ३१३ मतदान केंद्रस्थळांवर एकूण ३४५ मतदान केंद्रे आहेत. यावेळी एकूण १७३ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्या निवडणुकीच्या अनुषंगाने २६७ राजापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जैसमिन यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती या पूर्वी दि. १ जुलै २०२४ रोजी अर्हता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून, मतदार यादीत १,१२,७९३ पुरुष मतदार तर १,२३,२६८ स्त्री मतदार असे एकूण २,३६,०६१ मतदार आहेत. त्यापैकी दिव्यांग मतदार १३३३ आहेत तर ८५ वर्षावरील एकूण ४४२१ मतदार आहेत. तसेच सैनिक मतदार ४८ आहेत. त्या नंतर मतदार यादी निरंतर प्रक्रियेची कामे सुरु आहेत. दि. १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत नवीन मतदार नोंदणीसाठी फॉर्म नं. ६ स्विकारण्यात येत आहेत. या फॉर्मवर २९ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. जैसमिन यांनी दिली.

राजापूर विधानसभा मतदारसंघात ३१३ मतदान केंद्रस्थळांवर एकूण ३४५ मतदान केंद्र आहेत. एकूण १७३ मतदान केंद्रावर Web Casting करण्यात येणार आहे. या मतदार संघात भरारी पथक (FST) ०९, स्थिर सर्व्हेक्षण पचक (SST)- १२ व्हिडीओ सर्व्हक्षण पथक (VST)- ०६ व व्हिडीओ पाहणी पथक (ततढ)- २ अशी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. तालुक्यातील पन्हळे तर्फे सौदळ, अणुस्कुरा नाका, धारतळे पोलिस नाका व कळकदरा मुर्शी फाटा येथे स्थिर सर्वेक्षण पथक (SST) नियुक्त करणेत आलेले आहेत अशी माहिती त्यांनी पुढे बोलताना दिली.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आदर्श आचार संहिता लागू झाल्यापासून २४ तासांत शासकीय कार्यालय, ४८ तासांत सार्वजनिक ठिकाणे व ७२ तासांत खासगी ठिकाणी अशा ठिकाणी असलेल्या राजकीय नेत्याचे फोटो, पोस्टर, झेंडे, बॅनर, कटआऊट काढण्याबाबत कारवाई करण्याबाबत आचारसंहिता पथकाला सूचना दिल्यानंतर तशी कारवाई सुरु झाल्याची माहिती राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. जैसमिन यांनी पत्रकारांना दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 17/Oct/2024