भोस्ते घाटात दरड कोसळली

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात रविवारी (२७ जुलै) दुपारी मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याची बाब निदर्शनास आली आहे. या दरडीमुळे सुमारे २०० फुट उंचावरुन दगड व माती महामार्गाच्या रस्त्यालगत आली असून, मातीचा मोठा ढिगारा महामार्गालगत साचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात मुंबईवरून गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या रस्त्यालगत दरड कोसळली आहे. मात्र, या भागात केवळ दोन बॅरल लावून दरड रोखण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले असून, ही उपाययोजना अत्यंत अपुरी आणि असमाधानकारक असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

या परिसरात अजूनही दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. पावसामुळे जमीन सैल झाल्याने आणि डोंगर उतारांवर झाडांची संख्या कमी झाल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 29/Jul/2025