देवरुख : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाताना गुगल मॅपद्वारे शॉर्टकट शोधून फुणगुस मार्गे जाताना रसायनाते भरलेला टेम्पो उलटून अपघात झाल्याची घटना सोमवारी घडली. अपघातात आयशरमधील रसायन भरलेले बॅरल जंगलात घरंगळत गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.
सुदैवाने टेंपोच्या चालकाने गाडीतून उडी मारल्यामुळे जीवित हानी टळली. रंगासाठी लागणारे ४७बॅरल घेऊन हा टेम्पो (जे. जी. ३७ वी २२६०) चालक गोवा महामार्गावरून मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला.
उक्षी मार्गावरील अवघड वळणावर फुणगूस येथे सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो उजव्या बाजूला कलंडला. यामध्ये असलेले ४७बॅरलपैकी ३० बॅरल घटनास्थळी शिल्लक राहिले असून बाकीचा उतारातून घरंगळत गेले. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बाबतची माहिती पोलिस पाटील यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्याला दिली असून पोलिस घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 29/Jul/2025














