आजचे राशीभविष्य, २९ जुलै २०२५

मेष – आजचा दिवस आनंददायी आहे. आर्थिक लाभ झाल्याने गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वीपणे पूर्ण होतील.

वृषभ – आज वैचारिक पातळीवर थोरपणा व गोड वाणी ह्यामुळे इतरांना प्रभावित करू शकाल.

तसेच त्यांच्याशी संबंधात सुसंवाद निर्माण करू शकाल.

मिथुन – आज मनाची स्थिती दोलायमान राहील. मन द्विधा बनेल. जादा हळवेपणा मनाला बेचैन करेल. आई विषयी अधिक भावनाशील व्हाल.

कर्क – शारीरिक व मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरण सुद्धा आनंदी असेल. मित्र व स्नेहीजन ह्यांचा सहवास घडेल.

सिंह – आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. खर्च मात्र वाढतील.

कन्या – आज आपल्या वैचारिक समृद्धी व मोहक वाणी ह्यामुळे लाभ होऊन सौहार्दपूर्ण संबंध वाढवून काम पूर्ण कराल.

तूळ – आज आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अविचारी वर्तनाने अडचणीत याल. एखादा अपघात संभवतो.

वृश्चिक – आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी – व्यवसायात फायदा होईल, मित्रांचा सहवास घडेल.

धनु – आज यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे.

मकर – आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. लेखन अथवा साहित्य विषयक कार्य व्यवस्थित पार पडेल.

कुंभ – आज आपण नकारात्मक विचारा पासून दूर राहावे. वाद, भांडणे ह्यापासून सुद्धा दूर राहावे. राग व बोलण्यावर संयम ठेवाव.

मीन – आज व्यापार्‍यांना उज्ज्वल भविष्य आहे. भागीदारीसाठी अनुकूल दिवस आहे.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 29-07-2025