रत्नागिरी : मत्स्य पदवीधारकांची तातडीने भरती करण्याची मागणी

रत्नागिरी : शासनाच्या अधिनस्त असलेल्या मत्स्य व्यवसाय विभागात मत्स्य सहायक, मत्स्य निरीक्षक यासारख्या पदांची भरती गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. सुशिक्षित आणि प्रशिक्षणप्राप्त उमेदवारांची संख्या मोठी असूनही भरती न झाल्याने त्यांचे नुकसान होत आहे. यासाठी शासनाने तातडीने भरती सुरू करावी, अशी मागणी मत्स्य महाविद्यालयाच्या माजी पदवीधरकांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.

मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होत नाही. मत्स्य व्यवसायातून राज्याला सर्वाधिक रोजगार मिळत असताना यातील पदवीधरकांना बेरोजगार राहावे लागते. मात्र ना. नितेश राणे यांनी मत्स्यला कृषी दर्जा मिळवून दिल्यानंतर या क्षेत्रातील पदवीधरांना संधी उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या ना. राणे यांची भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या आणि निवेदन दिले.

या निवेदनामध्ये शासनाच्या अधिनस्त असलेल्या मत्स्य व्यवसाय विभागात मत्स्य सहायक, मत्स्य निरीक्षक यासारख्या पदांची भरती गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. सुशिक्षित आणि प्रशिक्षणप्राप्त उमेदवारांची संख्या मोठी असूनही भरती न झाल्याने त्यांचे नुकसान होत आहे. यासाठी शासनाने तातडीने भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. मत्स्य विद्याशाखेतील डिप्लोमा, पदविका व पदवीधारक विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत स्थान मिळावे यासाठी विशेष भरती मोहिमा राबवाव्यात. खासकरून मत्स्य विभागातील सहाय्यक, निरीक्षक पदांवर विद्यार्थ्यांना घेण्यासाठी शासनाने विशेष धोरण आखावे. स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ स्थापण्याची मागणी या निवेदनात केली आहे. यावर ना. राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या मागण्यांचा प्राधान्याने विचार करण्याचे आश्वासन दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 29/Jul/2025