चिपळूण : पाचाड येथे स्वच्छता मोहीम

चिपळूण : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी पालवण यांच्या पुढाकाराने पाचाड गावात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या प्रसंगी गावचे सरपंच नरेश घोले, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहिमेअंतर्गत गावातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता उपक्रमाची संकल्पना सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून साकारण्यात आली असून, ग्रामस्वच्छतेसाठी घेतलेला हा पुढाकार निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. या उपक्रमास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे तसेच प्रा. प्रशांत इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 29/Jul/2025