रत्नागिरी : टपाल कार्यालयाचे व्यवहार २ ऑगस्टला बंद राहणार

रत्नागिरी : भारतीय टपाल विभागाने टपाल सेवांमध्ये डीजिटल परिवर्तन घडवण्यासाठी आयटी २.० उपक्रमात एपीटी अॅप्लिकेशन ही नवीन प्रणाली लागू करण्यात येत आहे. यासाठी २ ऑगस्टला एक दिवस टपाल कार्यालयाचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी आवश्यक सेवेचे नियोजन त्याप्रमाणे करण्याचे आवाहन डाकघर अधीक्षकांनी केले आहे.

येत्या ४ ऑगस्टला रत्नागिरी डाक विभागातील दोन्ही प्रधान डाकघरे रत्नागिरी व चिपळूण आणि त्या अंतर्गत येणाऱ्या उपडाकघरांमध्ये, शाखा डाकघरांमध्ये नवीन प्रणाली लागू करण्यात येणार आहे. एपीटीचा उद्देश हा सुधारित वापरकर्ता अनुभव, जलद सेवा वितरण आणि अधिक ग्राहक-स्नेही सेवा प्रदान करणे हा आहे. नव्या प्रणालीमुळे व्यवहार जलद, अचूक व ग्राहकाभिमुख होणार असल्याचा विश्वास रत्नागिरीच्या डाकघर अधीक्षकांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 29/Jul/2025