रत्नागिरी : जलजीवन मिशनच्या ‘क्षेत्रीय भेट’ वाहनांचे ५० लाख थकले

रत्नागिरी : जलजीवन मिशनच्या कामानिमित्त क्षेत्रीय भेटीसाठी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या वाहनांचे मागील १० महिन्यांपासूनचे ५० लाख रुपयांचे भाडे थकले आहे. त्यामुळे गाड्या पुरवठादार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनांद्वारे घराघरांत नळजोडण्या देण्यात येत आहेत. त्यामुळे वाड्यावस्तींवरील पाण्याची समस्या दूर होणार आहे. जिल्ह्यात योजनांची कामे वाड्यावस्त्यांवर सुरू आहेत; मात्र कामे सुरू असली तरी अजूनही ठेकेदारांची देयके अदा करण्यात आलेली नाहीत. ८० कोटी रुपयांची देयके थकीत आहेत. त्यामुळे ठेकेदार हवालदिल आले आहेत. जलजीवन मिशनच्या नळपाणी योजनांची कामे जिल्ह्यात वाड्यावस्त्यांवर सुरू आहेत.

त्या कामांकडे लक्ष देण्यासाठी कार्यकारी अभियंता तसेच ९ तालुका अभियंते अशा एकूण ११ गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. या गाड्यांचा वापर क्षेत्रीय भेटी देण्यासाठी अधिकारी करतात; मात्र या गाड्यांचे ऑक्टोबर २०२४ पासूनचे भाडे थकीत आहे. त्यामुळे गाड्या पुरवठादार आर्थिक अडचणीत आला आहे. थकीत भाडे मिळावे यासाठी पुरवठादार जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उंबरठे झिजवत आहेत; मात्र शासनाकडून निधी न आल्याने अधिकारी तरी थकीत भाडे कोठून देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 29/Jul/2025