संगमेश्वर : श्री सूर्यनारायण मंदिरात श्रावणी कार्यक्रम उत्साहात

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे येथील श्री सूर्यनारायण मंदिरात श्रावणी हा धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाला.
प्रत्येक वर्षी मंदिरात नागपंचमी दिनी, श्रावणी हा धार्मिक कार्यक्रम केला जातो. श्रावणी अर्थात या दिवशी होम हवन करुन ब्राह्मण समाज यज्ञोपवीत(जानवे) बदलतात.

कोकणातील अनेक मंदिरात श्रावणी हा धार्मिक कार्यक्रम करण्याची प्रथा आजही जोपासली जाते. यावेळी भटजी वेदांचे,पठण व सोबतच होम हवन करून यज्ञोपवीत बदलले जाते. श्री सूर्यनारायण मंदिरात झालेल्या या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल अध्यक्ष अशोक पोंक्षे यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:17 29-07-2025