चिपळूण : शहरातील शिवाजीनगर येथील बसस्थानकाच्या नावात बदल करून छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक असे नाव द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा सचिव सागर कदम यांनी चिपळूण आगार व्यवस्थापनाकडे केली आहे.
तीस दिवसांत यावर कार्यवाही न झाल्यास पक्षामार्फत तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या संदर्भात सागर कदम व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन चर्चा केली तसेच निवेदन दिले. गेली कित्येक वर्षे चिपळूण शिवाजीनगर येथील एसटी आगाराला शिवाजीनगर आगार असा महापुरुषांच्या नावाचा एकेरी भाषेत उल्लेख केलेला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 17/Oct/2024












