रत्नागिरी : रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्रातील योगशास्त्राच्या विद्याथ्यांनी यश मिळवले. बीए आणि एमए योगशास्त्र विषयाच्या चार विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरासाठी झाली.
रत्नागिरी जिल्हा योगासन क्रीडा संघटना, महाराष्ट्र योगासन क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नागिरी जिल्हा योगासन क्रीडा स्पर्धेची निवड फेरी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे झाली. त्यात निकिता लाड (बी.ए. प्रथम वर्ष), पूर्वा पावसकर, महादेव काळे आणि अपूर्वा मुसळे (सर्व बी.ए. द्वितीय वर्ष) यांचा समावेश आहे. उपकेंद्रातील प्रा. अक्षय माळी आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू सौरभ कुमार (नागपूर) यांचे योग प्रात्यक्षिकासाठी मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. अविनाश चव्हाण, प्रा. कश्मिरा दळी, राष्ट्रीय योगपटू दुबाँकूर चाळके आणि रत्नागिरी जिल्हा योग असोसिएशनचे अध्यक्ष गौरव आंब्रे यांचे सहकार्य लाभले.
या यशाबद्दल कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी व रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 29/Jul/2025














