Rajan Salvi : राजन साळवी यांची ठाकरे गटावर टीका..

Rajan Salvi धाराशिव : उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लोक सोडून जात आहेत, त्याचं आत्मचिंतन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी करावं, असा सल्ला माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे . रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी फेब्रुवारी महिन्यात शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला.

ठाण्यातील आनंद आश्रमात हा पक्षप्रवेशाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंना मोठा धक्का दिला. अशातच त्यांनी आता ठाकरे गटावर टीका करत लोकांचं दुःख, वेदना, याचना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचत नाहीत, असा आरोप उद्धव ठाकरेंच्या सोबत असणाऱ्या नेत्यांवर केला आहे.

एकनाथ शिंदेंना दुसरा पर्याय नाही- राजन साळवी

दोन ठाकरे एकत्र येण्याचा एकनाथ शिंदेंना फटका बसणार नाही, एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व कणखर आहे. असेही ते म्हणाले. मुंबई, ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे मोठं काम असून ठाण्यासह अनेक भागात एकनाथ शिंदेंना दुसरा पर्याय नाही. असे मत राजन साळवी (Rajan Salvi) यांनी यावेळी व्यक्त केलं. ठाकरे बंधू एकत्र आल्यावर फटका बसेल का? या प्रश्नावर राजन साळवी यांनी हे उत्तर दिलंय. आजच्या घडीला महाराष्ट्रात फक्त एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आमची वाटचाल असल्याचंही साळवी म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले समाजसेवेचे व्रत एकनाथ शिंदेंनी घेतलंय, त्यांच्यासोबत आमचं मार्गक्रमण सुरुआहे. तानाजी सावंत आमचे नेते आहेत. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात काम सुरू आहे. असे म्हणत सावंत यांच्या नाराजीची चर्चा राजन साळवी यांनी फेटाळून लावली आहे.

मुंबई महानगर पालिकेत सर्वोच्च मतांनी महायुतीचाच विजय- राजन साळवी

मुंबई महानगर पालिकेत सर्वोच्च मतांनी महायुतीच निवडून येईल, असा विश्वासहि राजन साळवी यांनी बोलताना व्यक्त केला आहे. धाराशिव आणि लातूर जिल्ह्याचे समन्वयक म्हणून एकनाथ शिंदेंकडून राजन साळवींची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राजन साळवी यांच्याकडून विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतला जात आहे. यावेळी ते बोलत होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:40 29-07-2025