रत्नागिरी : गोगटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागामार्फत जागतिक कांदळवन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावर्षी कांदळवन परिसंस्था व त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजण्यासाठी रनपार येथील कांदळवन परिसंस्थेला विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्या परिसंस्थेतील कांदळवन व सहयोगी कांदळवनाच्या प्रजाती, तेथील फुलोरा यांची माहिती विद्यार्थ्यांनी मिळवली. याच कांदळवनांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रा.शरद आपटे व वनस्पतीशात्र माजी विभाग प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन यांच्या व्याख्यानांचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला. प्रास्ताविक व स्वागत विभाग प्रमुख डॉ. सोनाली कदम यांनी केले. व्याख्यात्यांची ओळख डॉ. विराज चाबके यांनी करून दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:42 PM 29/Jul/2025














