रत्नागिरी: महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या विशेष पुढाकाराने रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील शाळा क्रमांक ५ च्या विद्यार्थ्यांना छत्र्या आणि पौष्टिक फळांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत ये-जा करताना दिलासा मिळणार असून, फळांमुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. याप्रसंगी उपशहर प्रमुख विजय खेडेकर, शिवसेना महिला शहर संघटक वैभवी खेडेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी शशी आलीम, हेमंत जाधव, प्रीतम पावसकर, संतोष नाचणकर, प्रशांत आयरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या मदतकार्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.













