दापोली : वाकवली- उन्हवरेत एसटी गटारात कलंडली

गावतळे : दापोली तालुक्यातील वाकवली-उन्हवरे मुख्य रस्त्यावर मंगळवारी (ता. २९) सकाळी कामतकोंड येथे सव्र्व्हिसिंग सेंटरजवळ रूखी-खेड ही एसटी गटारात कलंडली.

रूखी येथून एसटी खेडकडे जात होती. त्याचवेळी वाकवली-उन्हवरे रस्त्यावर आली असता स्र्वेसिंग सेंटरजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना ब्रेक न लागल्याने डाव्या बाजूकडील गटारात कलंडली. बसमध्ये फक्त २ प्रवासी होते. सुदैवाने, त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. गावतळे पोलिस पाटील विशाल म्हाब्दी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ जेसीबी त्यांनी बोलवला. बस गटातून बाहेर काढण्यात आली. बस बाहेर काढण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रणव पवार, प्रशांत पवार, मनोज पवार, विकास पवार, जयेश मोरे, कृष्णा घडवले, जयेश खतले यांनी सहकार्य केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 30/Jul/2025