चिपळूण : चिपळूण शहरातील वाणीआळी, एकता अपार्टमेंटमधील रुम नंबर २०१ मध्ये ओवेस जलफीकार मल्ला (वय २२) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (२९/०७/२०२५) सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओवेस मल्ला याने आपल्या राहत्या घरी संडासच्या खिडकीला असलेल्या लोखंडी ग्रीलला बेडशीटच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. त्याचा मृतदेह त्याच अवस्थेत आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चिपळूण पोलीस ठाण्यात याबाबत आमृ. क्रमांक ४५/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तरुण ओवेसच्या आत्महत्येने वाणीआळी परिसरात शोककळा पसरली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 30/Jul/2025














