दापोली : एसटी बस आणि पिकअप टेम्पोची समोरासमोर धडक

दापोली : दापोली बांधतिवरे एसटी बस आणि पिकअप टेम्पो यांची समोरासमोर धडक झाल्याने यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. रस्ता अरुंद असल्याने दोन्ही वाहने समोरासमोर धडकली, असा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना २८ रोजी सायंकाळी घडली आहे.

याबाबत दापोली पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. एसटी बस ही बांधतीवरे आतगाव अशी जात असताना अरुंद रस्त्यावर हा अपघात झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 30/Jul/2025