राजापूर : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यापूर्वी आठ काळ्या बुरशींच्या प्रजातींचा शोध लागला आहे. आता पुन्हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये दोन नव्या काळ्या बुरशींच्या प्रजातींचा शोध लागला आहे.

निरुपद्रवी प्रकारातील ही बुरशी असून, साधारणपणे जंगलामधील झाडांच्या पानांवर आढळून येते. बुरशींच्या प्रजाती या नव्या प्रजातीच्या बुरशी जंगली जस्मिन आणि तांबूट या वृक्षांच्या पानावर आढळतात.
काळ्या बुरशीच्या नव्या संशोधित प्रजातींचे शिवाजी विद्यापीठातील निवृत्त कवकशास्त्रज्ञ डॉ. अनंत थिटे यांच्या नावावरून ‘अस्टेरीना थिटेड’ आणि डॉ. चंद्रहास पाटील यांच्या नावावरून ‘अस्टेरीना चंद्रहासाई’ असे नामकरण करण्यात आले आहे. राजापुरातील आबासाहेब मराठे महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रतीक नाटेकर, कै. कु. दुर्गा बमनेरू विज्ञान महाविद्यालय लोणार येथील प्रा. डॉ. महेंद्र भिसे व श्रीमान निरंजन जगद्गुरू पंचम श्री निजलिंगेश्वर महास्वामी ट्रस्टचे, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, विज्ञान आणि वाणिज्य पदवी महाविद्यालय निडसोशी, हुक्केरीतील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सिदानंद कुंभार यांच्या टीमने दोन वर्षांच्या अभ्यासानंतर काळ्या बुरशीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावला आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वनस्पतींवर अभ्यास करताना डॉ. नाटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या विशिष्ट प्रकारच्या बुरशी नजरेस पडल्या. या बुरशींचे नमुने गोळा करून पुणे येथील आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट येथे पुढील तपासणीसाठी पाठवले. बुरशींच्या या नमुन्यावर अभ्यास करून नवीन बुरशींचे नामकरण करण्यात आले. डॉ. नाटेकर यांनी आजपर्यंत सहकाऱ्यांसमवेत दहा नव्या काळी बुरशी (ब्लॅक मिल्डूज) म्हणजे मुख्यतः जंगली अधिवासात येणारी निरुपद्रवी बुरशी. साधारणपणे ज्या ठिकाणी हवेमध्ये जास्त प्रमाणात आर्द्रता असते त्या ठिकाणच्या वनस्पतींच्या पानावर, देठावर व खोडावर ठळकपणे काळे स्पॉट तयार करून फक्त जगण्यासाठी वनस्पतीमधील अन्न शोषून घेणारी बुरशी. आतापर्यंत कुठल्याच कृषी पिकावर तिचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊन नुकसान झाल्याची नोंद नाही. (अपवाद फक्त सिट्रस मॅक्सिमा यावरती मेलिओला सिट्री-मॅक्सिमी ही प्रजाती थायलंड येथून नोंद केलेली आहे.)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 30/Jul/2025














