गुहागर : गुहागरमध्ये रविवार, दि. ३ ऑगस्ट रोजी अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका यांच्यातर्फे श्रावण भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन महोत्सवाचे आयोजन भंडारी भवन गुहागर येथे करण्यात आले असून, दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता व्याडेश्वर देवस्थान ते भंडारी भवन दिंडी सोहळा, सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन, १०.३० वाजता गुहागर तालुक्यातील भजन मंडळाचे भजन सादरीकरण तसेच आयोजक मंडळातील ज्येष्ठ कलावंतांचे भजन सादरीकरण. दुपारी १२ वाजता साठ वर्षांवरील वृद्ध कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.
तालुक्यात प्रथमच अशाप्रकारच्या भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हावे, वृद्धापकाळात कलाकारांनी दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपण केलेल्या कलेच्या सेवेचा शासनाकडून मिळणारा मोबदला मिळावा यासाठी सर्व भजनी कलाकारांनी संघटित राहावे यासाठी या भजनी मेळाव्याचे आयोजन केले आहे, असे अखिल भोजन संप्रदाय हितवर्धक मंडळ तालुका गुहागरचे अध्यक्ष सागर मोरे यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार विनय नातू उपस्थित राहणार असून, सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 30/Jul/2025














