गुहागर : अमावास्येनंतर समुद्राला आलेल्या उधाणाच्या लाटांनी गुहागर येथील वरचा पाट व बाग परिसरातील किनाऱ्याला दणका बसला आहे. किनाऱ्याची धूप झाली असून, पन्नासहून अधिक सुरूची झाडे कोसळली आहेत. किनाऱ्यावरील लोकवस्तीला सध्या धोका नसला तरीही भविष्यात लाटांचे पाणी तिथपर्यंत पोहोचण्याची भीती आहे.
समुद्र खवळलेला असून, किनाऱ्यावर अजस्त्र लाटांचा मारा सुरूच आहे. गुहागर येथील वरचा पाट व बाग किनारी परिसरात लाटांच्या माऱ्यामुळे किनाऱ्याची धूप झालेली आहे. सुरुची अनेक झाडे कोसळली असून, समुद्राचे पाणी आत शिरत आहे. किनारपट्टीची धूप झाल्यामुळे भरतीचे पाणी थेट लोकवस्तीकडे वळू लागले आहे. लाटांमुळे किनारपट्टीवरील कासव संवर्धन केंद्रांच्या जमिनीची
मोठ्या प्रमाणात धूप झाली असून, तिथे कासवांच्या हॅचरी उभारणे अशक्य होणार आहे. त्यामुळे कासव संवर्धन मोहिमेतही अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येथील किनारा सुमारे दीड ते दोन किलोमीटर लांबीचा असून, सर्वत्र गंभीर परिस्थिती आहे. या परिसरातील जेटोच्या बांधकामालाही फटका बसलेला आहे. अजून दीड महिना पावसाळा आहे. त्यामध्ये सतत अशीच परिस्थिती राहिली तर किनाऱ्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान होईल.
अभ्यास करण्याची गरज
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मुहागर आणि विशेषतः वरचा पाट परिसरात किनारपट्टीची धूप वेगाने होत आहे. पूर्वी लोकवस्तीपर्यंत पाणी कधीच येत नव्हते, मात्र आता ती परिस्थिती बदलली असून, किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे याबाबत अभ्यास करणे आवश्यक आहे, असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
समुद्राला आलेल्या उधाणामुळे गुहागर किनाऱ्यावर वरचा पाट भागात धूप झाली असून, सुरूची झाडेडी कोसळली आहेत. याबाबत संबंधित विभागाला पत्र देऊन सूचित करणार आहे. सध्यातरी लोकवस्तीला धोका नाही: परंतु भविष्यात पाणी लोकवस्तीपर्यंत पोहोचू नये यासाठी योग्य ती काळजी घेण्यात पेईल. त्यासाठी पत्तन विभागाला पत्र देणार आहे- परिक्षित पाटील, तहसीलदार, गुहागर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 30/Jul/2025














