चिपळूण : ढोक्रवलीत यंत्राद्वारे भातलावणीचे प्रात्यक्षिक

चिपळूण : तालुक्यातील ढोक्रवली येथे दिनेश कदम यांच्या प्रक्षेत्रावर कोकण कृषी विद्यापीठाने निर्माण केलेले मनुष्यचलित भातलावणी यंत्राद्वारे भातलावणीचे प्रात्यक्षिक झाले. कमीत कमी मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त शेती भातपिकाखाली कशी येईल, या अनुषंगाने हे यंत्र तयार केले आहे.

प्रशिक्षणावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे, मंडळ कृषी अधिकारी जयेश काळोखे, सहायक कृषी अधिकारी विजय साळुंखे, राजश्री निंबाळकर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 30/Jul/2025