सावर्डे येथील गोविंदराव निकम विद्यालयात टाकाऊतून टिकाऊ राखी निर्मितीत कोमल सावंत प्रथम

सावर्डे : सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान छंद मंडळाच्या वतीने ‘एक देश, एक राखी’ या उपक्रमांतर्गत टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ राखी तयार करण्याच्या स्पर्धेत कोमल सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावला तर तिर्था कोकाटे द्वितीय आणि आरोही चव्हाणने तृतीय क्रमांक मिळवला.

आराध्या थरवळ आणि दुर्वा परकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. मातृभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र सज्ज असलेल्या जवानांसाठी या राख्या पाठवून विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा अनोखा संदेश दिला. पाचवी ते आठवीतील १२० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी नैसर्गिक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून आकर्षक राख्या तयार केल्या. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागवणे, पर्यावरण संवर्धनाचे भान निर्माण करणे व भारतीय संस्कृती जोपासणे हे होते. या उपक्रमाचे उ‌द्घाटन व पारितोषिक वितरण विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान शिक्षक वर्षा चव्हाण, श्रेया राजेशिर्के, वैभवी भुवड, कविता हळदीवे, दामिनी महाडिक आणि सुधीर कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 30/Jul/2025