रत्नागिरी : येथील लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मिस्त्री हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. याप्रसंगी तालिमी इम्दादिया संस्थेचे सहसचिव शकील मजगांवकर, मुख्याध्यापिका मुनव्वर तांबोळी, ज्येष्ठ शिक्षिका मुमताज काझी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रय्यान मजगांवकर याच्या कुरआन पठणाने झाली. पर्यवेक्षक मुश्ताक आगा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
या वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘टिळक एक आदर्श नेता, विद्यार्थी दशेतील टिळक, टिळकांचे शैक्षणिक कार्य हे विषय ठेवण्यात आले होते. ही स्पर्धा प्राथमिक (इ.५वी) व उच्च प्राथमिक (इ.६वी ते ८वी) अशा दोन गटात पार पडली. प्राथमिक गटातून सादिया खान प्रथम, इफ्रा शरीफ भाटकर तृतीय, उच्च प्राथमिक गटातून सौबान मुईन सय्यद, इब्राहीम इम्तियाज सिद्दीकी, बुशरा आफताब खान यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. परीक्षण राशीद काद्री, रूखसाना फडनाईक, शाजिया बुडये यांनी केले.
नगर परिषद द्वारा अजिजा दाऊद नाईक हायस्कूल येथे आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेमध्ये मिस्त्री हायस्कूलच्या मुलींनी बाजी मारली. या स्पर्धेत मोठ्या गटात अयाना रमजान भाटकर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला.
प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका मुनव्वर तांबोळी, पर्यवेक्षक मुश्ताक आगा आणि तालीमी इम्दादिया संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष अब्दुल हमीद मिस्त्री, सचिव तन्वीर मिस्त्री, सहसचिव शकील मजगांवकर, संस्थेचे खजिनदार जाहीर मिस्त्री, संस्थेचे उपाध्यक्ष व शाळा समितीचे अध्यक्ष निसार लाला, प्रमुख अधिकारी रफीक मुकादम, साबीर मजगांवकर, इकबाल मिस्त्री यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 30/Jul/2025














