रत्नागिरी : मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनीतर्फे महिलांसाठी १६व्या मॅमोग्राफी शिबिराचे उद्घाटन डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात झाले.
कार्यक्रमाला स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. वाळवेकर, पीएसएम विभागाचे प्रमुख डॉ. वेल्हाळ, अधिष्ठाता व सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. मानसिंगराव घाडगे, वहाळच्या सरपंच कदम, डॉ. आसावरी मोडक, सत्यव्रत नायक व मुकुल माधव फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ. वाळवेकर यांनी महिला सक्षमीकरणातील मुकुल माधव फाउंडेशनच्या प्रभावी कार्याचे कौतुक केले. डॉ. वेल्हाळ यांनी मॅमोग्राफी शिबिराच्या आयोजनाबद्दल आभार मानले. जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची माहिती पोहोचण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले ज्यामुळे जास्तीत जास्त स्त्रिया शिबिराचा लाभ घेऊ शकतील आणि त्यांची संपूर्ण तपासणी करू शकतील, वालावलकर हॉस्पिटलसोबतचा हा संयुक्त उपक्रम सुरू ठेवल्याबद्दल डॉ. सुवर्णा पाटील आणि डॉ. वाळवेकर यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या विश्वस्त रितू छाब्रिया यांचे विशेष आभार मानले. सर्व महत्वाच्या चाचण्या फक्त १०० रुपयात केल्या जात आहेत. पाठपुरावा सुविधाही एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या आहेत.
पंधरा शिबिरे
रत्नागिरीची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन उत्तरेकडील तालुक्यांसाठी २०१९ पासून वालावलकर हॉस्पिटलच्या सहकार्याने मॅमोग्राफी शिबिरे चालू झाली. आजपर्यंत एकूण १५ शिबिरे यशस्वीरित्या आयोजित केली. या शिबिरांचे फक्त आयोजनच नाही तर शिबिरानंतर पाठपुरावादेखील केला जातो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:57 PM 17/Oct/2024












