गावखडी शाळेत रानभाज्या प्रदर्शन

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी येथील सरस्वती विद्यामंदिरमध्ये आयोजित रानभाज्या प्रदर्शनात सहभाग घेत विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. सरस्वती विद्या मंदिर, गावखडी या शाळेत सोमवारी (दि.२८) नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी रानभाजी प्रदर्शन भरविण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका प्राप्ती कदम आणि सहकारी शिक्षक यांच्या
संकल्पनेतून आणि पालकाच्या सहकार्याने हे प्रदर्शन यशस्वी झाले.

भागातील ची माहिती ना व्हावी, हा नामागचा उद्देश या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अळू, अळंबी, घोळ, भारंगी, काटल, कुडा, शेवगा, मुळा, माठ, तेंडली, काकड़, करडई, आदी रानभाज्या मांडल्या होत्या. रानभाज्या पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक व शाळेतील कर्मचारी यांनी गर्दी केली होती. मुलांना आपल्या भागातील रानभाज्यांची माहिती व्हावी आणि त्यांना त्यांचे महत्त्व कळावे, या उद्देशाने
विद्यार्थ्यांसाठी हे रानभाज्या प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 30/Jul/2025