गुहागर : शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे हे तत्काळ भरले जावेत अशा मागणीचे निवेदन मनसेचे शहर अध्यक्ष अभिजित रायकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.
गुहागर शहरातील रस्त्यांवरील खड्डे त्वरित भरण्याबाबत दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर हे एक पर्यटन स्थळ आहे. तसेच याठिकाणी तालुका कार्यालये देखील आहेत. मात्र येथील शहातील बाजारपेठ तसेच बाजारपेठ ते बाग गाव या रस्त्यावर अनेक दिवसांपासून मोठे खड्डे पडले आहेत या खड्यांमुळे अनेक अपघात घडत आहेत तसेच यापुढेही होण्याची दाट शक्यता आहे आणि वाहन चालकांना तसेच पदाचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रात्रीच्या वेळी तर ही परिस्थिती अधिक धोकादायक बनते कारण अंधारात खड्डे स्पष्ट दिसत नाहीत यामुळे वाहन चालक आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून वाहनांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे आगामी गणपती सण हा काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे या रस्त्यावर आपण वेळीच लक्ष न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून याच खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी आपण या गंभीर समस्ये कडे तातडीने लक्ष घालून शहरातून रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर भरण्याची व्यवस्था करावी असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, तालुका सचिव प्रशांत साठले, शहराध्यक्ष अभिजीत रायकर, उपतालुका अध्यक्ष अमित खांडेकर, प्रथमेश रायकर, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 30/Jul/2025














