मंडणगड : तालुक्यातील दहागाव बौद्ध वाडी येथे राहणाऱ्या रंजना विठ्ठल जाधव (वय 84) यांचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना 23 जुलै 2025 रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. त्या रात्री झोपल्यावर बाथरूमसाठी उठून गेल्या आणि परत येऊन अंथरुणावर झोपल्या असता, त्यांच्या पाठीवर साप चावल्याची घटना घडली.
सर्पदंशानंतर तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच 27 जुलै रोजी मध्यरात्री 2 वाजून 30 मिनिटांनी त्यांचे निधन झाले, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद मंडणगड पोलिस ठाण्यात 28 जुलै 2025 रोजी रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी करण्यात आली आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली असून, वयोवृद्ध महिलेच्या निधनामुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 30/Jul/2025









