Ben Stokes Ruled Out : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरची कसोटी उद्यापासून सुरु होणार आहे. ओव्हलच्या मैदानावर पाचवी कसोटी खेळवली जाईल. या कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे.
इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स ओव्हल कसोटीतून बाहेर गेला आहे. उजव्या खांद्याला दुखापत झाल्यानं बेन स्टोक्स संघाबाहेर गेला आहे. इंग्लंडनं पाचव्या कसोटीसाठी संघ जाहीर केला आहे. पाचव्या कसोटीत संघात चार बदल करण्यात आले आहेत. बेन स्टोक्स बाहेर गेल्यानं संघाचं कर्णधार पद आता ओली पोपकडे देण्यात आलं आहे.
इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशा आघाडीवर आहे. भारतासाठी पाचवी कसोटी महत्त्वाची आहे. इंग्लंडनं नेहमीप्रमाणे कसोटीसाठीचा संघ लवकर जाहीर केला त्याप्रमाणं संघात चार बदल करण्यात आले आहेत. कॅप्टन बेन स्टोक्स दुखापतीमुळं संघाबाहेर गेला आहे. बेन स्टोक्स सह डॉसन, जोफ्रा आर्चर आणि कार्स यांच्या ऐवजी इतरांना पाचव्या कसोटीत स्थान देण्यात आलं आहे.
इंग्लंडचा पाचव्या कसोटीसाठी संघ :
झॅकक्रॉली, बेन डकेट, ओली पोप (कॅप्टन), जो रुट, हॅरी ब्रुक, जेकब बेथेल, ख्रिसवोक्स,गसएटकिन्सन, जेमीओवर्टन, जोश टंग
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:03 30-07-2025














