रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता बनलाय विक्रेत्यांचा नाका

रत्नागिरी : नवरात्रौत्सवाच्या कालावधीत येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रमुख प्रवेशद्वारासमोर झेंडूची फुले घेऊन अनेक विक्रेते बसले होते. नवरात्रौत्सव संपला तरी या विक्रेत्यांनी फुले आणि फळांचा व्यापार सुरूच ठेवला. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जयस्तंभ मार्ग विक्रेत्यांचा नाका झाला आहे.

त्यातच कोजागिरीमुळे शेंगा आणि फळविक्रेत्यांमध्ये वाढ झाली. त्यामुळे या भागातील गर्दी वाढली असून, वाहतूक कोंडीही होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:02 17-10-2024