रत्नागिरी : कोकणचा सर्वात मोठा आणि लोकप्रिय उत्सव असलेल्या गणपती उत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यामुळे कोकणात येणाऱ्या आणि जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने आज (बुधवार) जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.
मडगाव ते लोकमान्य टिळक (T) दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या :
प्रसिद्धीपत्रकानुसार, गाडी क्रमांक 01004 मडगाव जं. लोकमान्य टिळक (T) साप्ताहिक विशेष (दररोज) ही गाडी 24 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 7 सप्टेंबर 2025 रोजी प्रत्येक रविवारी मडगाव जंक्शनहून दुपारी 4:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6:00 वाजता लोकमान्य टिळक (T) येथे पोहोचेल.
त्याचप्रमाणे, परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01003 लोकमान्य टिळक (T) मडगाव जं. साप्ताहिक विशेष ही गाडी 25 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर 2025 रोजी प्रत्येक सोमवारी सकाळी 8:20 वाजता लोकमान्य टिळक (T) येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10:40 वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.
महत्वाचे थांबे आणि डब्यांची रचना :
या विशेष गाड्या करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलावडे, अदवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या प्रमुख स्थानकांवर थांबतील.
गाडीच्या रचनेत एकूण 20 एलएचबी (LHB) डबे असतील, ज्यात 1 एसी 2 टायर, 3 एसी 3 टायर, 2 एसी 3 टायर इकॉनॉमी, 8 स्लीपर, 4 जनरल डबे, 1 जनरेटर कार आणि 1 एसएलआर डबा यांचा समावेश असेल.
प्रवाशांनी या विशेष गाड्यांच्या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच, या गाड्यांच्या थांब्यांच्या आणि वेळेच्या सविस्तर माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सुनील बी नारकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी ही माहिती दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:47 PM 30/Jul/2025














