माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळ धामणसे संचलित, माध्यमिक विद्यालय धामणसे (ता. जि. रत्नागिरी) प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अविनाश सखाराम जोशी हे आज ३१ जुलै २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात..
हा लेख लिहिताना मला अत्यंत आनंद होत आहे. सोमगंगा नदीच्या काठावर निसर्गरम्य धामणसे गाव वसले असून तेथे माध्यमिक विद्यालयाची इमारत उभी आहे. या प्रशालेत अनेक विद्यार्थी शिकले, मोठे झाले, विविध क्षेत्रात त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. सरांच्या सहवासात मी १९९६ ला प्रथम एस. एस. सी. बॅच १९९६-९७ ला आलो. माझे क्रीडा मार्गदर्शन व इंग्रजी अध्यापन सुरू झाले. शाळा विनाअनुदानित असताना शाळेला अनुदान प्राप्त करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना पहिल्यापासून योग्य मार्गदर्शन, सल्ला व काम करून घेण्याची वेगळी पद्धत मी पाहिली आहे. त्यांचा स्वभाव, संयम, चिकाटी व स्वतः विद्यार्थी प्रिय होते. मुलांच्या गरजा व मुलांची कौशल्य पाहून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये सरांचे मोलाचे योगदान आहे. ३१ वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर जोशी सर सेवानिवृत्त होत आहेत. सरांना निरोप देताना सरांनी शाळेसाठी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेने खूप प्रगती केली. आज ते निवृत्त होत असले तरी त्यांचे मार्गदर्शन संस्थेसाठी व विद्यालयासाठी प्रेरणादायी राहील.
शाळेच्या मुख्याध्यापकपदी विराजमान झाल्यापासून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये रत्नसिंधू शिक्षण संस्था पुरस्कार रत्नागिरी, यशवंत गुणवंत आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी श्री. दुर्गुळे यांच्या हस्ते मिळाला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, रत्नागिरी यांच्याकडून आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, शिक्षक आमदार रामनाथ दादा मोते महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्राप्त झाला. संकेत कला क्रीडा प्रतिष्ठान पुणे या संस्थेचा विशेष राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे यांच्या हस्ते मिळाला. तरुण भारत रत्नागिरी यांच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक सरपंच, शैक्षणिक, सामाजिक तसेच इतर क्षेत्रात भरीव कामे केल्याबद्दल तरुण भारत रत्नागिरी संपादक यांच्याकडून सत्कार झाला. ग्रामीण देवरुखे ब्राह्मण संघ खालगाव रत्नागिरी आदर्श मुख्याध्यापक मिळाल्याबद्दल गौरव सन्मानपत्र, आमदार श्री. उदय रविंद्र सामंत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ यांच्या हस्ते अभिनंदन पत्र, सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या हस्ते शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल अभिनंदन पत्र मिळाले.
वैयक्तिक पुरस्काराबरोबर मालगुंड एस. एस. सी. केंद्र, जाकादेवी एस.एस.सी. केंद्र अंतर्गत सर्वोत्कृष्ट निकालांची परंपरा, शिक्षणाधिकारी श्री. दुर्गुळे साहेब शिक्षणाधिकारी हुलवान, रत्नागिरी प्रांत अधिकारी श्रीमती फरोग मुकादम, जिल्हा परिषद रत्नागिरी, शैक्षणिक गुणवत्ता विकास कायम ढाल पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान, अनेक वेळा शंभर टक्के दहावीचा निकाल लागल्यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक गुणवत्ता विकास कायम ढाल पारितोषिक वितरण व विद्यालयाचा सन्मान झाला आहे.
माध्यमिक विद्यालय धामणसे विद्यालय छोटे असले तरी शाळेची क्रीडा क्षेत्रामध्ये नेहमी उंच भरारी घेतली आहे. यामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी द्वारा आयोजित विविध गटातील शालेय मैदानी, ग्रामीण मैदानी, साई मैदानी पायका पंचायत युवा खेळ क्रीडा मैदानी स्पर्धा, अटल क्रीडा महोत्सव मैदानी स्पर्धा, रत्नागिरी ते गणपतीपुळे चॅम्पियन रिले स्पर्धा, पाटपन्हाळे मॅरेथॉन स्पर्धा, जे. एस. डब्ल्यू उद्योग समूह जयगड मॅरेथॉन, कोकण किनारा क्रॉस कंट्री, आम्ही रत्नागिरीकर रत्नागिरी आमची दौड मॅरेथॉन स्पर्धा, डेरवण क्रॉस कंट्री स्पर्धा, शिवार आंबेरे मॅरेथॉन स्पर्धा, तारवेवाडी मॅरेथॉन स्पर्धा या विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
विद्यालयाच्या खेळाडूंनी तालुका जिल्हा विभाग राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत उतुंग भरारी घेतली आहे. राष्ट्रीय खेळाडू मंजिरी सुरेश रेवाळे राज्यस्तरावर अडथळा १०० मीटर, २०० मीटर, ४०० ४×१०० मीटर रिले, लांब उडी तसेच विविध खेळाडू विभाग राज्यस्तरावर अनेक पदक विजेते खेळाडू आहेत.
सन २०११ ते १२ मध्ये पालकमंत्री भास्करराव जाधव यांच्या हस्ते १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी पंधरा हजार रुपये रोख पारितोषिक व प्रोत्साहन अनुदान देऊन गौरव करण्यात आला.
स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक म. पटवर्धन यांच्याकडून क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल १०,००० रुपये देऊन विद्यालयाचा गौरव, धामणसे ग्रामपंचायत युवा खेळ क्रीडा अभियान पायका मैदानी स्पर्धा घवघवीत क्रीडा क्षेत्रात कामगिरी केल्याबद्दल सन २००९-१०/२०१०, ११/२०११ मध्ये प्रति वर्ष चार हजार रुपये रोख पारितोषिक पालकमंत्री भास्करराव जाधव यांच्या हस्ते प्रशाला व धामणसे ग्रामपंचायतचा गौरव करण्यात आला. यामध्ये मुख्याध्यापक जोशी सर यांचे सहकार्य व प्रेरणा प्रोत्साहन व पाठिंबा व मार्गदर्शन यामुळे क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यास मदत झाली. त्यांच्याबरोबर सन २००२ मध्ये कु. स्वाती सूर्यकांत कुलकर्णी हिला एस. वाय. गोडबोले पुरस्कार शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते, सन २००३ मध्ये कु. मोहिनी एकनाथ बळकटे हिला एस. वाय. गोडबोले पुरस्कार शिवाजीराव भोसले, मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू यांच्या मिळाला. राष्ट्रीय खेळाडू कुमारी मंजिरी सुरेश रेवाळे हिचा राष्ट्रीय खेळाडूंच्या पोलीस दलातील विक्रमामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरव झाला.
सेवानिवृत्त हा एक नवीन टप्पा असतो जो व्यक्तीला कामातून विश्रांती घेण्याची संधी देतो मुख्याध्यापक म्हणून शाळेच्या उभारणीत आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी मोलाचे योगदान दिले दिलेल्या व्यक्तीसाठी हा क्षण खूप महत्त्वाचा असतोच अशा व्यक्तीच्या कार्याचा गौरव करणे त्यांच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा देणे हे समाजाचे कर्तव्य आहे. त्यामुळे आज ३१ जुलै रोजी त्यांच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापक म्हणून कौतुक होत आहे, अशा गौरवशाली व्यक्तिमत्त्वाला उदंड दीर्घायुष्य निरोगी लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
-श्री. दत्तात्रय दादासाहेब गायकवाड
बीए, बीपीएड (मो. ९९२१७०८८७१)
क्रीडा विभाग प्रमुख, माध्यमिक विद्यालय, धामणसे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 31-07-2025












