राजापूरमध्ये गोवा बनावटीच्या दारूसह टेम्पो जप्त; ३.६३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

राजापूर, ३० जुलै: रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा चेकपोस्टवर पोलिसांनी गोवा बनावटीची दारू घेऊन जाणारा एक टेम्पो पकडला. पहाटे २ वाजण्याच्या सुमारास केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ६३,६५० रुपयांची दारू आणि ३ लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण ३ लाख ६३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

राजापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ३० जुलै २०२५ रोजी पहाटे २.०० वाजण्याच्या सुमारास अणुस्कुरा चेकपोस्टवर पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजाराम बळीप (पोकों ७१४) हे त्यांचे सहकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक के. एस. पाटील (सपोफौ/११७६) आणि पोलीस कॉन्स्टेबल रामदास पाटील (पोकॉ/१०१) यांच्यासोबत नाकाबंदी करत होते.

यावेळी MH/०७/AJ/३७३९ क्रमांकाची टाटा इन्ट्रा टेम्पो व्ही.३० ही गाडी संशयास्पद स्थितीत येताना दिसली. पोलिसांनी थांबवून तपासणी केली असता, गाडीत गोवा बनावटीची दारू अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. चालकाने कोणताही परवाना नसताना ही दारू आपल्या ताब्यात बाळगली होती.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत, गाडीतील ७५० मिली मापाच्या १२ सीलबंद रॉयल ग्रँड मॉल व्हिस्कीच्या प्लास्टिक बॉटल्स जप्त केल्या. या दारूची किंमत ६३,६५० रुपये आहे. तसेच, दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ३ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची टाटा कंपनीची चार चाकी टाटा इन्ट्रा-टेम्पो व्ही.३० गाडी क्रं. MH/०७/AJ/३७३९ देखील जप्त करण्यात आली.

याप्रकरणी पोलिसांनी लक्ष्मीप्रसाद सखाराम मांजरेकर (वय ४०, रा. गाडीअडंडा, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात ३० जुलै २०२५ रोजी सकाळी ७.३८ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३७/२०२५, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ए) (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गोवा राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या दारूच्या अवैध वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी अणुस्कुरा चेकपोस्टवर पोलीस सातत्याने कारवाई करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 31-07-2025