दापोली डम्पिंग ग्राउंडशेजारी रानडुकरांचा उच्छाद

दापोली : भरदिवसा दापोली शहरातील डम्पिंग ग्राउंड शेजारी – काही दिवसांपासून रानडुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. कळपाने फिरत असणाऱ्या या रानडुकरांमुळे येथील रहिवासी भयभीत झाले आहेत. येथील रहिवसी वस्तीत रानडुकरांचा वाढलेला वावर अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला आहे.

याठिकाणी लहान मुले, महिलांचा वावर असतो. शाळकरी मुलांची दिवसभर ये-जा असते, तर रात्री या ठिकाणी घरी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे या बाबत दापोली वनविभागाने लक्ष घालून या रानडुकरांचा बंदोबस्त करावा आणि पुढे होणारी एखादी दुर्घटना टाळावी, अशी येथील रहिवासी मागणी करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 31/Jul/2025