रत्नागिरी : अखिल भारतीय शिक्षक संघातर्फे केंद्रीय शिक्षामंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या केंद्रीय अध्यक्ष बसवराज गुरींकर महासचिव कमलाकर त्रिपाठी, रत्नागिरी अध्यक्ष दिलीप देवळेकर उपस्थित होते. या भेटीदरम्यान अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी हे प्रश्न लवकरच सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शिक्षकांवर गुन्हे नोंद करताना पार्श्वभूमीचा सखोल अभ्यास करावा अनावश्यक गुन्हे नोंद करू नयेत. शिक्षकांना जनगणना निवडणुका या व्यतिरिक्त अन्य कामे देण्यात येऊ नये. सर्व राज्यांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व शिक्षकांना वेतन आयोग लागू करावा या व अशा इतर प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 31/Jul/2025













