खेड : तालुक्यातील ऐनवरे व परिसरातील सात ते आठ गावांमध्ये गेल्या वर्षभरापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने आतापर्यंत ३ सहा शेतकऱ्यांची तब्बल दहा जनावरे भक्षण केली असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २९ जुलैला ऐनवरे गावातील पोलिस पाटील शिवाजी पोफळकर यांच्या बंद वाड्यात घुसून बिबट्याने सहा महिन्यांचे वासरू उचलून नेले.
वासराला बारी मोडून ते जंगलात घेऊन गेले. ही घटना भरदिवसा घडल्याने गावकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बिबट्याचा वावर ऐनवरे, तिसंगी मोहल्ला, मोहाने, ऐनवली, कुळवंडी, तांबरीची वाडी, गुणदे या गावांमध्ये सातत्याने होत आहे. तो सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा कोणत्याही वेळी गावात, रस्त्यांवर आणि बंदिस्त वाड्यांमध्ये शिरतो. ग्रामस्थांनी या संदर्भात वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ऐनवरे गावचे दिनेश पोफळकर यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 31/Jul/2025














