मेष – आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. घरातील वातावरण आनंदी राहील.
वृषभ – आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अचानकपणे खर्च करावे लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील.
मिथुन – आज उत्साहाचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे.
कर्क – आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील.
सिंह – आज बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वाद टाळावे लागतील.
कन्या – आपल्या प्रभावी वक्तृत्वाने आपण प्रेमळ व लाभदायी संबंध प्रस्थापित करू शकाल.
तूळ – आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. बोलण्यावर संयम ठेवल्यामुळे वातावरण शांत करण्यात सफल व्हाल.
वृश्चिक – विवाहेच्छुकांचा विवाह ठरण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. प्राप्ती व व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे.
धनु – आज आपली कामाची योजना यशस्वीपणे पूर्ण होईल. व्यावसायिक यश प्राप्ती होईल.
मकर – परदेशगमनाची अपेक्षा करणार्यांना यशप्राप्ती संभवते. एखादा प्रवास संभवतो.
कुंभ – आजचा दिवस काहीसा प्रतिकूल असल्याने नव्या कामाची सुरुवात आज न करणे हितावह राहील.
मीन – आज व्यापारी भागीदारीत आपणाला लाभ होईल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 31-07-2025














