रत्नागिरी : नगरपालिकेच्या शाळेतील पदवीधर अंकुश खरवतेकर यांना मुंबई विद्यापीठाने शिक्षणशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी जाहीर केली आहे. अंकुश खरवतेकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेच्या आत्मसात करण्यावर (एलिप्स महाराष्ट्र इंग्रजी भाषा उपक्रम फॉर प्रायमरी स्कुल्स) प्रकल्पातील शिक्षणतंत्रांचे परिणाम-एक गंभीर अभ्यास या विषयावरील संशोधन विद्यापीठाला सादर केले होते. महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या इंग्रजी विषयाच्या अनेक प्रशिक्षणांमध्ये त्यांनी राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे.
महाराष्ट्र शासनाने ब्रिटिश कौन्सिलच्या साहाय्याने राबवलेल्या ‘एलिप्स’ या इंग्रजी विषयाच्या प्रकल्पामध्ये त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. या प्रकल्पाअंतर्गत आयोजित प्रशिक्षणातून शिक्षकांना इंग्रजी अध्यापनाची अनेक नावीन्यपूर्ण तंत्रे परिचित करून दिली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 31/Jul/2025













