माखजन : अवघ्या पंचवीस दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माखजन परिसरातील गणेश मूर्ती शाळांमध्ये लगबग पहायला मिळत आहे. मूर्तिकार सध्या रंगरंगोटी च्या कामात मग्न असलेले पहायला मिळत आहेत. अवघ्या कोकणवासीयांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या गणेशोत्सवाची चाहूल परिसरात लागलेली दिसून येत आहे. विविध मूर्ती कारखान्यांमध्ये बाप्पा साकारताना पहायला मिळत आहेत.
मध्यंतरी च्या काळात प्लास्टर च्या मूर्ती वापरण्यावर भर असे. पण पर्यावरणपूरक मूर्ती निर्मिती च्या जनजागृतीतून शाडूच्या मूर्ती बनवण्याकडे, लक्षणीय वाढ होताना दिसंत आहे. ग्राहकांच्या मागणी नुसार विविध रुपातील बाप्पा, कारखान्यांमध्ये साकारला जात आहे. माखजन आरवली परिसरामध्ये सुमारे १० गणेश मूर्ती कारखाने असून, परिसरात मोठ्या धुमधडाक्यात गणेश उत्सव साजरा करण्यात येतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 31/Jul/2025














