देवरूख : तरुणाने विष प्राशन केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील कुंडी धावडेवाडी येथे बुधवारी सकाळी घडली. सोहम राजाराम पवार (वय २१) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रेयसी बोलत नसल्याच्या नैराश्यातून त्याने हे कृत्य केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोहम याची प्रेयसी गेले चार-पाच दिवस त्याच्याशी बोलत नव्हती. या नैराश्येतून त्याने बुधवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास विष प्राशन केले. सोहमला अस्वस्थ वाटू लागल्याने देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थिर होत असल्याच्या माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.
या घटनेची नोंद देवरुख पोलिस स्थानकात करण्यात आली असून, याबाबत अधिक तपास देवरूख पोलिस स्थानकाचे निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 31/Jul/2025














