खेड : रसाळगडावरील जनसुविधा केंद्राचे काम रखडले

रत्नागिरी : श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शान पावन झालेल्या रसाळगड किल्ल्यावर पर्यटक आणि भक्तांसाठी मंजूर झालेल्या जनसुविधा केंद्राचे काम वनविभागाच्या हरकतीमुळे थांबले असून, हे काम तातडीने सुरू करण्यात यावे या मागणीसाठी महाराणी रत्नागिरी अहिल्यादेवी समाज प्रबोधन रोजी खेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन छेडण्यात येणार आहे.
रामचंद्र आखाडे मंच यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी खेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन छेडण्यात येणार आहे.

रसाळगड हा झोलाई वाघजाई देवीचे जागृत मंदिर आणि पंचक्रोशीतील दहा गावांचे ग्रामदैवत असलेला ऐतिहासिक किल्ला असून, शिवप्रेमी व भाविकांच्या मोठ्या संख्येने येथे नियमितपणे वर्दळी असते; मात्र गडावर शौचालयासारख्या मूलभूत सुविधेचा अभाव असल्याने पर्यटकांना आणि विशेषतः महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव अंतर्गत पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणातील १० राज्य संरक्षित स्मारकांवर जनसुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात रसाळगड किल्ल्याचाही समावेश असून, सुलभ इंटरनॅशनल सोशल सव्र्व्हस ऑर्गनायझेशन या संस्थेमार्फत काम सुरू करण्यात आले होते. मात्र काम ७५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असताना अचानक वनपरिक्षेत्र अधिकारी दापोली यांनी हे काम थांबवले आणि संबंधित सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्यात आला.

वनविभागाचा दावा आहे की, रसाळगड किल्ला भूप्रभाग क्रमांक १०९ अंतर्गत त्यांच्या हद्दीत येतो. त्यामुळे कोणतेही बांधकाम करताना त्यांची परवानगी आवश्यक आहे. दुसरीकडे किल्ला हा राज्य संरक्षित स्मारक असल्यामुळे त्याची मालकी ही पुरातत्त्व विभागाकडेच आहे, असा सरकारचा अधिकृत निर्णय आहे.

या विभागांतील समन्वयाअभावी काम रखडले असून, मागील सहा महिन्यांपासून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष रामचंद्र बाबू आखाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार असून, जिल्ह्यातील सर्व शिवभक्त, शिवप्रेमी, सामाजिक व राजकीय संघटनांनी या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:13 PM 31/Jul/2025