मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने मुंबईतील कोकणवासीयांनी कोकणात गावी येण्याची तयारी सुरू केली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त कोकणात येण्यासाठी २५० विशेष रेल्वेच्या फेऱ्या चालवण्याचे नियोजन केले होते.
त्यातच आता या २५० गाड्यांव्यतिरिक्त, मध्य रेल्वे आणखी ४४ गणपती विशेष ट्रेन चालवणार आहे.
दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनचा विस्तार आणखी २ सेवा वाढवून करणार आहे. येत्या गणपती उत्सवादरम्यान गणपती भक्तांच्या फायद्यासाठी आतापर्यंत घोषित एकूण २९६ गणपती विशेष ट्रेन चालणार आहेत.
अतिरिक्त ४४ गणपती विशेष ट्रेनचा तपशील खाली दिला आहे.
१) लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेन (एकूण ८ सेवा)
01131 द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेन प्रत्येक गुरुवार आणि रविवार दिनांक २८.८.२०२५, ३१.८.२०२५, ४.९.२०२५ आणि ७.९.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०८.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. (एकूण ४ सेवा)
01132 द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेन प्रत्येक गुरुवार आणि रविवार दिनांक २८.८.२०२५, ३१.८.२०२५, ४.९.२०२५ आणि ७.९.२०२५ रोजी सावंतवाडी रोड येथून २३.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (एकूण ४ सेवा)
थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.
संरचना : २ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसन व्यवस्था असलेले गार्ड ब्रेक व्हॅन.
२) दिवा -खेड -दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष (३६ सेवा)
01133 मेमू विशेष ट्रेन २२.८.२०२५ ते ८.९.२०२५ पर्यंत दिवा येथून दररोज दुपारी १३.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी २०.०० वाजता खेड येथे पोहोचेल. (एकूण १८ सेवा)
01134 मेमू विशेष ट्रेन २३.८.२०२५ ते ९.९.२०२५ पर्यंत खेड येथून दररोज सकाळी ०८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १३.०० वाजता दिवा येथे पोहोचेल. (एकूण १८ सेवा)
थांबे : निळजे, तळोजा पंचनाद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापेवामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी आणि कळंबणी बुद्रुक.
संरचना : ८ कोचची मेमू रेक्स (८ कार मेमू रेक्स)
दिवा- चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाड्यांचा विस्तार
ट्रेन क्रमांक 01155/01156 दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनच्या २ अतिरिक्त फेऱ्यांनी विस्तार करण्यात आलेला आहे. 01155 दिवा-चिपळूण विशेषची १ फेरी आणि
01156 चिपळूण-दिवा विशेषची १ फेरी वाढवण्यात आली आहे. यामुळे यापूर्वी जाहीर केलेल्या ३८ अनारक्षित विशेष ट्रेनऐवजी आता एकूण ४० अनारक्षित विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत.
दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेन आता २२.०८.२०२५ ते १०.०९.२०२५ या कालावधीत चालवण्यात येतील.
आरक्षण : गणपती विशेष ट्रेन क्रमांक 01131 साठी आरक्षण ३.८.२०२५ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
अनारक्षित कोचचे बुकिंग यूटीएस सिस्टमद्वारे करता येईल आणि सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस ट्रेनसाठी लागू असलेल्या अनारक्षित निवासस्थानासाठी सामान्य शुल्क आकारले जाते.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:44 31-07-2025














