IND vs NZ, 1st Test : टीम इंडियाला मोठा धक्का! जडेजाच्या चेंडूवर ऋषभ पंत गंभीर जखमी

India vs New Zealand 1st Test : बंगळुरूमध्ये टीम इंडियासाठी आजचा दिवस वाईट आहे. आधी टीम इंडियाने भारतात आपली सर्वात कमी धावसंख्या केली आणि त्यानंतर, जेव्हा न्यूझीलंडचा संघ प्रत्युत्तरात फलंदाजीसाठी आला, तेव्हा त्यांनी इतकी शानदार फलंदाजी केली की जणू काही खेळपट्टीच बदलल.

हेही ठीक होते, पण दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि यष्टिरक्षक ऋषभ पंतला अचानक मैदान सोडून परतावे लागले.

न्यूझीलंडच्या डावाच्या 37व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ऋषभ पंतसोबत हा अपघात झाला. रवींद्र जडेजा गोलंदाजी करत होता, समोर न्यूझीलंडचा डवान कॉनवे होता. आणि जडेजाचा चेंडू थेट पंतच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला लागला. चेंडू लागताच पंत मैदानावर झोपला आणि जोरात ओरडू लागला. सामना थांबवण्यात आला आणि पंतला पाहण्यासाठी भारतीय संघाचे फिजिओ धावतच मैदानात आले. पंतला नीट उभेही राहता येत नव्हते.

डिसेंबर 2022 मध्ये जेव्हा पंतला कार अपघातात गंभीर दुखापत झाली होती, तेव्हा त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती, अशी माहिती आहे. मात्र, त्याच्या दुखापतीचे गांभीर्य अद्याप स्पष्ट झालेले नाही. पंतच्या जागी ध्रुव जुरेल मैदानात उतरला असून तो यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे.

हा पहिला सामना आहे, त्यानंतर अजून दोन सामने बाकी आहे त्यामुळे पंतच्या दुखापतीने टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. यानंतर पुढील महिन्याच्या शेवटी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियालाही जायचे आहे, जिथे पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. असं असलं तरी ऋषभ पंत बऱ्याच दिवसांनी पुनरागमन करत आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियासाठी तंदुरुस्त राहणे खूप महत्त्वाचे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:08 17-10-2024