रेल्वे प्रवाशांना कन्फर्म तिकिटाची मागणी

आरवली : केंद्रीय रेल्वे मंत्री व भारतीय रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाड्यांचे कन्फर्म आरक्षण मिळेल असे जाहीर केले होते. तरीही अद्याप वेटिंग तिकिटे मिळत आहेत. प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देऊन केली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोकण रेल्वे गाड्यांमध्ये आसने शिल्लक असताना कन्फर्म आरक्षण न मिळता तत्काळ कोट्यातून आरक्षण घ्यावे लागते. त्यासाठी दुप्पट पैसे आकारण्यात येतात. मत्स्यगंधा गाडी क्रमांक १२६१९ या रेल्वे गाडी या बोगीतून प्रवास करीत असताना अशी परिस्थिती अनेक प्रवाशांच्या निदर्शनास आल्याने त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे कन्फर्म आरक्षणसाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती शेकासन यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 01/Aug/2025