रत्नागिरी : विद्युत खांबावर काम करत असताना वायरमन विजेचा धक्का बसून भाजल्याने जखमी झाला. ही घटना हातखंबा येथे घडली. सहकारी कर्मचाऱ्यांनी व स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ खांबावरून उतरवून खासगी रुग्णालयात दाखल केले.
पावसकर (पूर्ण नाव मिळाले नाही) हे हातखंबा हायस्कूलनजीक वीज खांबावर काम करत होते. यावेळी वीज वाहिनीवरील विद्युतप्रवाह बंद करण्यात आलेला होता. त्यानंतर हा कर्मचारी वीज खांबावरती दुरुस्तीचे काम करीत होता. अचानक विद्युत प्रवाह मागे (रिव्हर्स करंट) आल्याने तो खांबावर चिकटला.
त्याचवेळी सोबतीला असणाऱ्या कर्मचाऱ्याने खांबावरती वीज प्रवाह बंद केला. त्यानंतर महावितरण कर्मचाऱ्यासह ग्रामस्थांनी शिड्या आणून या वायरमनला खाली उतरवले. त्याच्या दोन्ही पायांना व हाताला जखमा झाल्या होत्या. नशीब बलवत्तर म्हणून या कर्मचाऱ्याचा जीव वाचला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हातखंबा येथील सामाजिक कार्यकर्ते निरंजन जठार व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच धावपळ करण्यात पुढाकार घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 01/Aug/2025














