गुहागर : रामपूर जिल्हा परिषद गट आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्याने गुरुवारी (ता. ३१) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मार्गताम्हाणे येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला, वाढीव बीजबील, नवीन स्मार्ट मीटर बसवणे, अंदाजे बील पाठवणे याचा जाब विचारण्यात आला.
ग्रामस्थांनी विविध मागण्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. त्यात वीज ग्राहकांच्या बिलात अचानक वाढ झाली आहे. ही बीजबिले पुन्हा तपासून सुधारित बिले द्यावीत. स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणतेही नवीन स्मार्ट मीटर बसवू नयेत. मीटर वाचन न करता अंदाजे बीजबिले काढली जातात त्याऐवजी वीज मीटरचे नियमित वाचन करून बिले काढावीत. खासगी कंपन्यांची नियुक्ती थांबवावी.
सर्व कामे महावितरणच्या माध्यमातून पारदर्शक व्हावीत. चुकीच्या कामांना जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 01/Aug/2025














