लांजा : आपल्या देशाचे रक्षणासाठी सीमेवर २४ तास डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी गुरुवारी लांजा हायस्कूलच्या विद्यार्थीनींनी १८०० राख्या पाठविल्या.
विद्यार्थिनींनी जवानांना पत्र लिहून राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलग २८ व्या वर्षी लांजा हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाने आपली ही परंपरा जपली आहे
न्यू इंग्लिश स्कूल व तु.पू. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजाच्या वतीने गेल्या २७ वर्षापासून आपल्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी राख्या पाठवल्या जातात. सीमेवर तैनात असलेल्या जवानांमुळेच आपण सुखाने झोपू शकतो.आपल्या देशाचे रक्षण होते. आणि म्हणूनच या जवानांसाठी लांजा हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाकडून दरवर्षी या राख्या पाठवल्या जातात यावर्षी देखील सलग २७ व्या वर्षी या राख्या लांजा हायस्कूल कडून पाठवण्यात आल्या.
ज्ञयंदा ही 158 bnbsf.पंजाब येथे राखी पाठवत ही परंपरा कायम ठेवत देशाच्या जवानांबद्दल आदर व्यक्त केला जात आहे.यावेळी मुख्याध्यापक वसंत आजगावकर ,पर्यवेक्षक मंगेश वाघाटे, सहायक पर्यवेक्षक रवींद्र वासुरकर ,शिक्षिका किर्ती परवडी,प्रमिला पाटील , मधुरा सिनकर ,अजय आग्रे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 01-08-2025














