खेड : मार्गावरील खड्डे त्वरित भरा; अन्यथा १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा

खेड : तालुक्यातील भरणेनाका ते खेड आणि खेड ते दापोली या मार्गावर रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्याचा वाहनचालकांना त्रास होत आहे. हे खडे तातडीने भरा अन्यथा १५ ऑगस्टला उपोषण करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे (शरदचंद्र पवार गट) देण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या खेड तालुका संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत तहसीलदार आणि पोलिस ठाण्यालाही देण्यात आली. या वेळी तालुकाध्यक्ष विनायक निकम, युवक अध्यक्ष सुरज जोगळे, ज्येष्ठ नेते वसंत गुरव, कैलास यादव, ज्येष्ठ कार्यकर्ते बाबाराम पवार, फजल मनियार, अनंत कांबळे, लक्ष्मण घोलप, विश्वास सुर्वे, रामचंद्र शिगवण आदी पदाधिकारी उपस्थित होते. भरणेनाका ते खेड आणि खेड ते दापोली या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करत असतात. खड्यांमुळे अपघातांची शक्यता असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तत्काळ दखल घेणे गरजेचे आहे, अशी मागणी पक्षाच्यावतीने करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 01/Aug/2025