राजापूर : क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत तालुक्यातील अणसुरे येथील आरोग्य उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात झालेल्या क्ष-किरण (एक्स-रे) तपासणी शिबिरात १६६ ग्रामस्थांची मोफत एक्स-रे तपासणी करण्यात आली.
क्षयरोग रुग्ण शोधून त्यांच्यावर वेळेत उपचार करून समाजात क्षयरोगाचे संक्रमण रोखणे, या उद्देशाने शासनाच्या माध्यमातून आरोग्य विभागातर्फे विशेष अभियान राबविले जात आहे. त्यातून अणसुरे येथे क्ष-किरण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अणसुरेचे सरपंच रामचंद्र कणेरी यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या शिबिराला श्रीकांत सावंत, मंगेश पाटील, नीलेश हंगे, राहुल कोकणे, आंचल मेळेकर आदी उपस्थित होते.
यावेळी महेश गावडे यांनी टीबीमुक्त भारत अभियानासंबंधी मार्गदर्शन केले. या शिबिराच्या यशस्वीततेसाठी अणसुरे उपकेंद्राच्या आरोग्यसेविका वसावे, आरोग्यसेवक चौगुले, माळी, समुदाय आरोग्य अधिकारी अर्जुन (समुदाय अधिकारी साखर), रुमडे, गटप्रवर्तक आणि आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 01/Aug/2025














